"व्हॉट्सऍप चालत नाहीये!" झुकरबर्ग सोडून आव्हाडांची ट्विटरकडे (मस्क) तक्रार!

17 May 2023 12:40:03
Jitendra Awhad

मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. कधी उद्योगपती अदानी , तर कधी अंबानींवर टीका करणाऱ्या आव्हाडांनी चक्क व्हॉट्सऍप चालत नाही म्हणून मार्क झुकरबर्ग यांच्याकडे तक्रार करायची सोडून एलॅान मस्क यांच्याकडे तक्रार केली आहे. आव्हाड त्यांच्या ट्विट्मध्ये लिहतात की," गेल्या २४ तासापासून माझे व्हॉट्सऍप चालत नाही.तरी मला या प्रकरणी संशय येत आहे. तरी एलॅान मस्क आपण लवकरात लवकर माझ्या तक्रार सोडवाल अशी आशा आहे", असे आव्हाडांनी लिहले आहे.
 
तसेच काहीवेळानी हे ट्विट डिलीट करत दुसऱ्या ट्विटमध्ये आव्हाड लिहतात,"माझा नेहमीच व्हॉट्सऍपच्या कामकाजावर विश्वास आहे. पंरतू गेल्या काही दिवसांपासून माझे व्हॉट्सऍप व्यवस्थित चालत नाही.त्यामुळे मी तक्रार केली आहे आणि मला या प्रकरणी संशय येत आहे", असे आव्हाडांनी लिहले आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी या ट्विटवर विनोदी रिप्लाय दिले आहेत.



Powered By Sangraha 9.0