टाळ वाजवण्यात दंग झालेले चंद्रकांतदादा पाटील म्हणतात , मी सुद्धा माळकरी!

17 May 2023 12:11:15
Chandrakant Patil
 
पुणे : येत्या काळामध्ये वारीला जाण्याचे जे जे टप्पे आहेत त्या त्या टप्प्यामध्ये सरकारने मुक्कामाच्या ठिकाणी निर्मल वारी म्हणून स्वच्छेतेची व्यवस्था केलीली आहे. पुणे विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वारी पुढे गेल्यानंतर त्या गावामध्ये झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. हे सगळे टप्पे व्यवस्थित व्हावे, असे मनोगत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात व्यक्त केले.

पुण्यातील पश्चिम विभाग वासंतिक उटी मंडळाने आयोजित केलेल्या सामुदायिक भजन सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमात चंद्रकांतदादा पाटील आले होते .कोविडच्या संकटानंतर वारीला जाणारे वारकरी कमी होतील असे अनेकांनी भाकीत केले होते. पंरतू मागील वर्षात १५ लाख वारकरी वारीला गेले. त्यात हा वसा तरुण पिढीमुळे पुढे चालला आहे त्यामुळे ही वारी वर्षानुवर्ष सुरू आहे,असे ही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
 
यावेळी उपस्थित वारकरी सांप्रदायच्या भजनी मंडळाच्या कार्यक्रमात चंद्रकांत दादांनी टाळ वाजवून भजनाचा आनंद घेतला.त्यामवेळी उपस्थितांनी वारकरी संप्रदायात दादांचे स्वागत केले.त्यावर दादांनी आपल्या गळ्यातील माळ दाखवत वारकरी असल्याचे सांगितले. यावेळी सामुदायिक भजन सोहळ्यात भजनी मंडळातील वारकऱ्यांचा चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 
Powered By Sangraha 9.0