मुंबई : अकोला येथे १३ मे रोजी विशिष्ट समाजाकडून दंगली घडवण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी दगडफेक ,जाळपोळ झाली. त्यावरून अकोला येथे झालेल्या दंगलीत पोलिस उशिरा पोहचले. अकोल्यातील दंगल पोलिसांनी घडवली का? पोलिसांनी जमावाची समजूत का नाही काढली? देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्याचबरोबर ते अकोल्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावी, असे काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
दरम्यान अकोल्यात जाणीवपुर्वक दंगली घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही अद्दल घडवू. काही संस्था आणि गटाकडून जाणीवपुर्वक ही दंगल घडवली गेली. सध्या त्या परिसरात शांतता आहे. राज्यात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. जे दंगली घडवण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांना अद्दल घडवणार, असे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.