ब्रेकींग न्यूज! त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढविण्याचा प्रयत्न

    15-May-2023
Total Views |
Trimbakeshwar Temple News
 
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतकेच नाही तर मुस्लिम समाजाकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढविण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र उरुसनंतर घुसखोरी करणाऱ्या मुस्लीमांना सुरक्षारक्षकांनी रोखले आहे.

दरम्यान मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात तणाव निर्माण होताच पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. तसेच मंदिर प्रशासनाकडून घुसखोरी करणाऱ्या जमावावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.