नेदरलँड भारताचे तिसरे सर्वात मोठे निर्यात केंद्र म्हणुन घोषित!

15 May 2023 14:46:42
 
Netherland
 
 
नवी दिल्ली : नेदरलँड हे 2022-23 या वर्षात भारताचे तिसरे सर्वात मोठे एक्सपोर्ट डेस्टिनेशन म्हणून घोषित करण्यात आले आहे. पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, रसायने आणि अॅल्युमिनियमच्या वस्तू यासारख्या वस्तूंच्या शिपमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे निर्यात वाढली आहे. असे पीटीआयने वाणिज्य मंत्रालयाचा हवाला देऊन नेदरलँडसोबत भारताचा व्यापाराचा अहवाल दिला आहे.
 
नेदरलँडसोबत भारताचा व्यापार अधिशेष देखील 2021-22 मध्ये USD 8 अब्ज वरून 2022-23 मध्ये USD 13 अब्ज पर्यंत वाढला आहे. नेदरलँड्सला भारताची निर्यात 2021-22 मध्ये USD 12.5 बिलियनच्या तुलनेत 2022-23 मध्ये सुमारे 48 टक्क्यांनी वाढून USD 18.52 अब्ज झाली आहे.
 
2021-22 आणि 2020-21 मध्ये, युरोपीय देशाकडे जाणारी शिपमेंट अनुक्रमे USD 12.55 अब्ज आणि USD 6.5 बिलियन होती. पुढे, 2021-22 मध्ये, नेदरलँड हे 2020-21 मध्ये भारतीय एक्सपोर्टसाठी पाचवे सर्वात मोठे डेस्टिनेशन होते. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) चे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, नेदरलँड्स हे युरोपसाठी एक केंद्र म्हणून उदयास आले आहे,ज्यामध्ये कार्यक्षम बंदर आणि रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाद्वारे EU शी कनेक्टिव्हिटी आहे.
 
Powered By Sangraha 9.0