विरोधकांच्या चांगल्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत : राज ठाकरे

14 May 2023 20:44:48
raj thackeray

बदलापूर
: 'पराभव मान्य करता येत नसेल तर काय बोलणार', असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप लगावला. ते बदलापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी माणसं असा टोलाही राज ठाकरेंनी भाजपला लगावला. तसेच भाजप नेते आशिष शेलारांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. मोदींमुळेच यांचं अस्तित्व असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंनी यावेळी दिली. विरोधकांच्या चांगल्या गोष्टी कधीतरी मान्य केल्या पाहिजेत असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  कर्नाटक विजयावर काँग्रेसला शुभेच्छा दिल्याचा दाखला देत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर विरोधकांचे अभिनंदन करू शकतात तर इतरांना, कार्यकर्त्यांना ते कळायला पाहिजे. त्यांनीही मोठेपणा दाखवावा असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, पराभव मान्य करता येत नसेल तर काय बोलणार असा टोलाही राज ठाकरेंनी नाव घेता फडणवीसांना लगावला. तसेच मनसेच्या गटबाजीवर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, कल्याणमध्ये गटबाजी नाही तर मतभेद असू शकतात. ते सोडवले जातील. पराभवातून काय बोध घ्यायचा नसेल तर तसेच राहा, असा उपरोधिक टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला लगावला.


Powered By Sangraha 9.0