मीसुद्धा जीवंत आहे, हे दाखविण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न : आशिष शेलार

14 May 2023 15:22:45
ashish shelar

मुंबई
: काँग्रस पक्षाच्या कर्नाटक विजयाचे श्रेय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेला दिले. त्या प्रतिक्रियेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंची प्रतिक्रिया ही केवळ 'मी पण जिवंत आहे' हे दाखवण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यांच्या प्रतिक्रियेला महत्व देण्याची गरज नसल्याचे आशिष शेलारांनी म्हटले. तसेच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या वकतव्याचादेखील शेलारांनी खरपूस समाचार घेतला. संजय राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय राऊतांनी उंची पाहून मग बोलावे, त्याचबरोबर त्यांनी डोकेसुध्दा चेक करून घ्यावे, असा टोला यावेळी भाजप नेते आशिष शेलारांनी राऊतांना लगावला.

दरम्यान, दि. १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. १३० हून अधिक जागांवर काँग्रेसने विजय प्राप्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निकालावर बोलताना म्हटले की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे हा विजय प्राप्त झाला.



Powered By Sangraha 9.0