पंतप्रधानांनी दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा

13 May 2023 18:23:21
pm modi

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकात काँग्रेस विजयी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाला जनतेने दिलेला कौल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन करत, लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यात काँग्रेस यशस्वी होईल, असा आशावादही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

त्याचप्रमाणे कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला त्यांचेही मी आभार मानत असून भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक आहे. आगामी काळात भाजप कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करेल, असाही विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.


Powered By Sangraha 9.0