कर्नाटकात काँग्रेसनं गुलाल उधळला, टी. रघूमुर्ती विजयी!

13 May 2023 13:01:55
T. Raghumurthy emerges victorious

नवी दिल्ली
: कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटकात काँग्रेस नेते टी. रघूमुर्ती विजयी झालेले आहेत.चल्लाकेरे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार टी रघुमूर्ती विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार रघुमूर्ती यांनी आपला व्यवसाय शेती आणि समाजसेवा असा उल्लेख केला आहे. ते पदवीधर असून त्याचे वय ५९ आहे.
 
दरम्यान काँग्रेसने आता पर्यत १५ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच भाजपने ७ , जेडीएसने २ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे बहुमत काँग्रेसच्या बाजूने असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे.
 
Powered By Sangraha 9.0