नवी दिल्ली : ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून लिंडा याकारिनो यांची निवड झाली आहे. एलॅान मस्क यांनी दि.१२ मो रोजी ही घोषणा केली होती. लिंडा सध्या एनबीसी युनिव्हर्सलच्या जाहिरात विभागाच्या प्रमुख आहेत. त्यामुळे लिंडा सहा आठवड्यानंतर ट्विटर या कंपनीचा पदभार सांभाळणार आहेत.
ट्विटरचे मालक मस्क यांनी ट्विट केले की, ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो यांचे स्वागत करताना मी उत्साहित आहे.यापुढे लिंडा प्रामुख्याने व्यवसाय ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करतील तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेन, असे मस्क म्हणाले.
जाहिरात उद्योगाचे चांगले ज्ञान
लिंडा याकारिनो यांना जाहिरातींचे उत्पन्न कसे वाढवावे यांचे पुरेपुर ज्ञान आहे. त्या २०११ पासून युनिव्हर्सल मीडियाशी निगडीत आहे. सध्या त्या कंपनीच्या जागतिक स्तरावर जाहिरात व्यवहाराच्या अध्यक्षा आहेत. याआधी त्यांनी कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागाचे नेतृत्व केले. Linda Yacarino यांना जाहिरात आणि डिजिटल मार्केटिंगचा १९ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.