राज्याच्या मंत्रिमंडळात विस्तार होणार!

11 May 2023 15:10:14
cm eknath shinde on new cabinet

मुंबई
: राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते सत्तासंघर्षावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. मुख्यमंत्री शिंदेंनी आमच्या पक्षात इनकमिंग सुरूच आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, पक्षात नवीन कार्यकर्ते येत आहेत, आणि हे कायमच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने फडणवीस-शिंदे सरकार कायदेशीर मान्यता दिली आहे. युतीचे सरकार सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. त्यामुळे फडणवीस-शिंदे सरकार महाराष्ट्रात स्थिर राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निकालामुळे ठाकरे गटाला (मविआ) मोठा धक्का बसला आहे.

Powered By Sangraha 9.0