मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ८ मे ते १५ मे दरम्यान निकाल लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११ मो रोजीच सत्तासंघर्षावर निकाल लागणार आहे.त्यादरम्यान महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या संपूर्ण घटनाक्रमाचा घेतला हा आढावा..
२० जून २०२२
एकनाथ शिंदेंची बंडखोरी
२२ जून
शिंदे यांच्यासोबत ४० पेक्षा अधिक आमदार सुरत येथून गुवाहाटीला रवाना
२३ जून
शिंदे यांच्यासह १६ समर्थक आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी
२४ जून
बंडखोरांना अपात्र ठरविण्याच्या हालचाली
२५ जून
बंडखोरांना अपात्र ठरविण्यासाठी नोटीस सर्वोच्च न्यायालयात
२७ जून
बंडखोरांना अपात्रतेपासून सर्वोच्च न्यायालयाचा तुर्त दिलासा
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी
२९ जून
उद्धव ठाकरे यांचा राजीनामा
३० जून
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदाची शपथ
१ जुलै
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप-शिंदेगटाकडून राहूल नार्वेकर उमेदवार
२ जुलै
३ जुलै
नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड, गटनेतेपदी एकनाथ शिंदेंना मान्यता
४ जुलै
एकनाथ शिंदेंनी विश्वासदर्शक ठराव जिंकला
७ जुलै
शिवसेनेच्या बंडखोरांना रोखण्यासाठी ठाकरे गट पुन्हा न्यायालयात
११ जुलै
एकनाथ शिंदे गटाला दिलासा, आमदारांवर कारवाई न करण्याचे विधानसभा अध्यक्षांना न्यायालयाचे आदेश
३१ जुलै
सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी लांबणीवर
३ ऑगस्ट
शिंदे गटाच्या बदललेल्या भूमिकेवर न्यायालयाची टीप्पणी
४ ऑगस्ट
ठोस निर्णय घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाला न्यायालयाचा आदेश
२३ ऑगस्ट
संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे
१४ फेब्रुवारी २०२३
सलग सुनावणी घेत हे प्रकरण सात जणांच्या खंडपीठाकडे देण्याबाबत युक्तिवाद
१७ फेब्रुवारी
तीन दिवसांच्या सुनावणीनंतर सात जणांच्या खंडपीठाकडे सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
२१ फेब्रुवारी
५ जणांच्या खंडपीठासमोर सलग सुनावणी
१६ मार्च
दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर सुनावणी संपली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल स्थगित ठेवला.