कर्नाटकात भाजप १०० टक्के पुन्हा सत्तेत येणार

10 May 2023 14:44:02
bommai

कर्नाटक
: मला विश्वास आहे की राज्यात १०० टक्के पुन्हा आमचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोम्मईंनी हा दावा केला आहे. त्याचबरोबर बोम्मई यांच्या पत्नी म्हणाल्या, ५०  हजारपेक्षा अधिक मतांनी बोम्मई निवडून येतील असा दावा त्यांनी केला.

सर्व पक्षीयांनी दणक्यात प्रचार केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळते आहे. विरोधकांकडूनही जोरदार प्रचार करण्यात आला. दरम्यान, काँग्रेसचे अनेक नेते भष्ट्राचारप्रकरणी जामीनावर आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि अन्य लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ६०हून अधिक केसेस ह्या लोकायुक्तांकडे दाखल आहेत.

Powered By Sangraha 9.0