आदिपुरुष ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद

10 May 2023 14:39:03

adipurush 
 
मुंबई : आदिपुरुष चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर अनेक उलटसुलट चर्चा होत होत्या. कित्येकांनी तर चित्रपट पाहणारच नसल्याचे घोषित केले. मात्र त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून समाजमाध्यमांवरून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. ज्या गटांनी टीझरवर टीकेची झोड उठवली होती त्यांनीच चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत आपले समर्थन जाहीर केले आहे.
 
ट्रेलर मध्ये प्रभास रामाच्या म्हणजे राघवाच्या भूमिकेत दिसून येत आहे तर सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन दिसते. रावणाची भूमिका अभिनेता सैफ अली खान करत आहे. प्रभास बऱ्याच कालावधीनंतर चित्रपटात काम करताना दिसून येणार आहे, त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. बाहुबली चित्रपटानंतर प्रभासची एक प्रतिमा जनमानसात तयार झाली होत. ती जपण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे.
 
सैफ अली खानने साकारलेल्या रावण या व्यक्तिमत्वावर फारच टीका झाली होती. डोळ्यात सुरमा घातलेला मुसलमान असेल असा दिसणारा रावण कसा असू शकतो? रावण हा दशग्रंथी ब्राम्हण होता, तो असली थेरं करत नव्हत्या अशी टीका अनेकांनी केली होती. मात्र ट्रेलर प्रेक्षकांना आवडला असल्याचे समाधान ओम राऊत याने व्यक्त केले. सर्व कलाकारांनी ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळी आपल्या भावना आणि भूमिका स्पष्ट केल्या. त्यावेशी कृती सेनन हिने चित्रपटातील तिला भावलेल्या प्रसंगाविषयी सांगितले.
 
कृती म्हणाली, "जेव्हा सीता वनवासात असते तेव्हा राघव तिला न्यायला एक न एक दिवस जरूर येथील. यावर तिचा विश्वास होता. हा विरहाचा पण पाटीवर असलेल्या विश्वासामुळे त्याची वाट पाहणाऱ्या सीतेचा क्षण मला फार भावला. या चरित्रासाठी मी माझे सर्वस्व दिले आहे. शेवटी त्या देवता आहेत आणि आपण माणसे. चूकभूल होईल त्यासाठी त्यांनी क्षमा करावी."
Powered By Sangraha 9.0