पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अटकेत

10 May 2023 18:51:39
imran khan

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात राजधानी इस्लामाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इम्रानला आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.

भ्रष्टाचाराच्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर असताना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (एनएबी) आदेशानुसार देशाच्या निमलष्करी दलाने मंगळवारी इम्रानला अटक केली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयातून केल्यानंतर इम्रान खानच्या समर्थकांनी मोठमोठ्या लष्करी इमारतींवर हल्ले केले. सायंकाळी सुरू झालेले हिंसक आंदोलन काल रात्रीही सुरूच होते. अनेक ठिकाणी जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी गोळीबारही केल्याचे वृत्त आहे, ज्यात अनेक जण जखमी झाले तर काहींचा मृत्यूही झाला.

त्यानंतर मंगळवारी रात्रीच पाकिस्तानी लष्कराने पीटीआय समर्थकांच्या तावडीतून इमारतींना मुक्त करण्यासाठी मोहीम सुरू केली. इम्रानच्या समर्थकांनी शेहबाज शरीफ यांचे खाजगी निवासस्थान आणि लाहोरमधील कॉर्प्स कमांडरच्या घराला आग लावली आणि बँका लुटल्याचे समोर आले आहे. या घटनेतंर पाकिस्तानात विविध शहरांमध्ये दंगलींना प्रारंभ झाला आहे. पाकिस्तानातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे पथक पीटीआय नेत्यांना अटक करत आहेत. इम्रानच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेश यांचाही समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0