प्रँक व्हिडिओ बनवल्यामुळे रागात थेट गोळीबार!

08 Apr 2023 14:33:47
 
Prank video
 
 
मुंबई : आजकाल प्रँक व्हिडिओ बनवणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. काही लोकांना प्रँकचा खूप राग येतो आणि ते नाराजही होतात. परंतु नुकत्याच झालेल्या एका घटनेत, एका अमेरिकन यूट्यूबरला प्रँक केल्यामुळे गोळ्या घातल्या आहेत. 1999 साली MTV वर "MTV Bakra" नावाचा रिअॅलिटी शो प्रसारित झाला तेव्हा भारतात प्रँक व्हिडिओंचा ट्रेंड सर्वाधिक प्रचलित होता, जो सायरसने होस्ट केला होता.
 
 
 
 
टॅनर कुक यूट्यूबवर क्लासिफाइड गून्स नावाचं स्वतःचं चॅनल चालवतो. यावर तो अनेकदा प्रँक व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याच्या चॅनलला जवळपास 43 हजार फॉलोअर्स आहेत. 2 एप्रिल रोजी टॅनर व्हर्जिनिया येथील डलास टाउन सेंटर मॉलमध्ये एक प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी पोहोचला. तो यासाठी तो 31 वर्षीय अॅलन कोलीच्या जवळ गेला. टॅनर प्रँक करत होता आणि त्याचा मित्र दुरून त्याचं रेकॉर्डिंग करत होता. असं सांगण्यात येत आहे, की अॅलनला टॅनरचा प्रँक आवडला नाही आणि त्याने टॅनरला गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.
 
या घटनेनंतर टॅनरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक केली. या घटनेनंतर आरोपी अॅलनविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली. त्यात असंही नमूद करण्यात आलं आहे की, पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा अॅलन पिस्तूलसह शॉपिंग सेंटरच्या फूड कोर्टात उपस्थित होता. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी माहिती दिली आहे की फूड कोर्टमध्ये टॅनर आणि अॅलन यांच्यात भांडण झालं, त्यामुळे गोळीबार झाला.
 
 
Powered By Sangraha 9.0