मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत येत्या दि. 9 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचा मुंबई प्रदेश चा महामेळावा अयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मुंबईतील बंजारा समाज हजारोंच्या संख्येने सामील राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाच्या बंजारा आघाडी चे राज्य अध्यक्ष सोमु उर्फ कामु पवार यांनी दिली.
मुंबईत बंजारा भवन निर्माण करण्याची बंजारा समाजाची मागणी असून याची दखल महाराष्ट्र शासनाने घेवून मुंबईत बंजारा भवन उभारण्यात यावे. मानखुर्द येथील सायन ट्रॉम्बे रोडवरील ट्रॉम्बे उड्डानपुलास संत सेवालाल महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी बंजारा समाजाची मागणी आहे. तसेच बंजारा समाजाला स्वंतत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देण्यात यावे या बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे रिपब्लिकन पक्ष पाठपुरावा करेल असे प्रतिपादन रिपाइंचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी यावेळी केले.