८ हजारांची नोकरी केली, आज फोर्ब्सच्या यादीतील अब्जाधीश!
06-Apr-2023
Total Views | 102
54
नवी दिल्ली : फोर्ब्सने नुकतीच जगभरातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी ९ व्या क्रमांकावर आहेत. पंरतू या यादीत भारतातील एका तरूणाचेही नाव आहे. तो म्हणजे निखिल कामथ. निखिल कामथ हा फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणारा सर्वात तरुण अब्जाधीश बनला आहे.निखिल कामथ हा वयाच्या १७ वर्षांचा असल्यापासून काम करू लागला. सुरुवातीला त्यांनी कॉल सेंटरमध्ये काम केले. जिथे त्याला रोज जवळपास २६६ रूपये मिळत म्हणजेच महिन्याला ८ हजार रूपये तो कमवत.
काही दिवस काम केल्यानंतर निखिल कामथ यांनी शेअर मार्केट ट्रेडिंगचे काम सुरू केले. सुरुवातीला त्यांनी शेअर ट्रेडिंगला अजिबात गांभीर्याने घेतले नाही. पंरतू नंतर त्याने गांभीर्याने काम करायला सुरूवात केली. आणि यामुळेच शेअर ट्रेडिंगच्या कामात झपाट्याने त्यांने प्रगती केली.यासाठी त्यांने वडिलांकडून पैसे घेवून ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले. काही वर्षे गुंतवणूक केल्यानंतर निखिलला शेअर मार्केट समजू लागले. त्यानंतर त्यांने नोकरी सोडली आणि शेअर ट्रेडिंगचे काम पूर्णपणे करायला सुरुवात केली.२०१० मध्य़े निखिलने भाऊ नितीन कामथसोबत झिरोधा नावाची कंपनी सुरू केली. नोकरी सोडल्यानंतर निखिलने पुर्णवेळ या कंपनीवर लक्ष केंद्रित केले आणि १२ वर्षात कंपनीला खूप उंचीवर नेले. आज कंपनीचे १० दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत. २०१० मध्ये भावासोबत उघडली झिरोधा कंपनी ज्यामुळे ती देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म बनली आहे.