प्रभासने केली २ चित्रपटांच्या प्रदर्शनाची घोषणा

06 Apr 2023 19:22:46

salar 
 
मुबई : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याने आपल्या २ चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या सुखद धक्क्याने प्रभासचे चाहतेही खुश झाले आहेत. काहीकाळापूर्वी प्रभासने आपल्या आदिपुरुष चित्रपटाची तारीख जाहीर केली होती तर आत्ता त्याने आपल्या या वर्षातच प्रदर्शित होणाऱ्या पुढील चित्रपटाचीही तारीख जाहीर केली आहे.
 
आपल्या पोस्ट मध्ये त्याने लिहिले आहे, "सर्वात मोठा क्रूर इसम लवकरच आपल्या भेटीला चित्रपटगृहात येत आहे. २८ सप्टेंबर 2023ला संपूर्ण पॅकेज घेऊन येत." 'सालार' या चित्रपटात प्रभास सोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत अभिनेत्री श्रुती हसन दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत निल करत आहेत. सूत्रांवर या चित्रपटाचे हक्क कोट्यवधी रुपयांना विकले गेले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0