जपानमध्ये पकडला गेला आतापर्यंतचा सर्वात खोल मासा

06 Apr 2023 20:25:43



snailfish



मुंबई (प्रतिनिधी):
दक्षिण जपानमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाखाली प्रथमच ८ किलोमिटरपेक्षा जास्त खोल पाण्यात वावरणारा एक मासा चित्रीत झाला आहे. संयुक्त जपानी-ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक मोहिमेमध्ये हे निदर्शनास आले आहे.

पहिल्यांदाच ५ मैलांपेक्षा जास्त खोलीच्या पाण्यात मासा आढळुन आला असुन तो या मोहिमेत त्याहीपेक्षा जास्त खोल पाण्यात चित्रीत करण्यात आला आहे. या मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ, प्राध्यापक अॅलन जेमिसन यांनी सांगितले की, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या (UWA) पथकाने दोन महिन्यांच्या प्रवासादरम्यान जपानच्या दक्षिणेकडील जपान खंदकात ८,०२२ मीटर पाण्याखाली दोन मासे पकडले गेले.

ग्रहावरील सर्वात खोल माशांच्या संख्येच्या १० वर्षांच्या अभ्यासाची ही संयुक्त मोहिम भाग आहे. याचा भाग असलेल्या संयुक्त मोहिमेद्वारे DSSV प्रेशर ड्रॉपमधून दूरस्थपणे चालवल्या जाणार्‍या कॅमेऱ्यांनी, दक्षिण जपानच्या इझु-ओगासवारा खंदकात ८.३३६ मीटर खोलवर पोहणाऱ्या अज्ञात स्नेलफिशच्या प्रजातीची नोंद केली गेली आहे.


Powered By Sangraha 9.0