मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदेगटाकडुन मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाकडुन केला जात होता. रोशनी शिंदे ह्या सहा महिन्याच्या गर्भवती असल्याची खोटी बातमी ठाकरे गटाकडुन पसरवण्यात आली होती. त्यात आता ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी रोशनी शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हंटलं आहे. उद्धव ठाकरेंनी धर्मवीर आनंद दिघेंची भेट घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्याप्रमाणे ठाकरे कुटुंबाने रोशनी शिंदेंची भेट घेतली होती. त्याची पुनरावृत्ती रोशनी शिंदेंच्या बाबतीत होऊ शकते अशी भीती मिनाक्षी शिंदेंनी व्यक्त केली आहे.
रोशनी शिंदे यांच्या जीवाला ठाकरे गटाकडूनच धोका आहे. रोशनी शिंदेला संरक्षण मिळावं, अशी मागणीही माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्राद्वारे केलेली आहे. त्या म्हणाल्या, "उद्या कुठल्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारलं तर काही कळणार नाही. त्यामुळे आम्ही पोलीस प्रोटेक्शनची मागणी करतोय. तिथे मुख्यमंत्र्यांनी सिव्हिल सर्जन नेमावे, अशीही आमची मागणी आहे."
ठाकरेंच्या भेटीनंतर दिघेंचा मृत्यु...
मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करताना सांगितले, “ज्यावेळी आनंद दिघेसाहेब अॅडमिट होते. तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी येऊन गेले. भेटून बाहेर आले त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात आनंद दिघे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? याबाबत ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? याचा खुलासा व्हायला पाहिजे. त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आत्तापर्यंत मिळालेली नाही. त्यांच्याबरोबर काय झालं नक्की कोणाला माहित नाही." असं मीनाक्षी शिंदे यांनी म्हंटलं आहे.