कल्याण : कल्याणमधील जागृत देवस्थान असलेल्या जरी मरी माता तिसाई देवीच्या यात्रेला गुरूवारी 6 एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. ही यात्र दोन दिवस चालणार आहे. या यात्रेला सुमारे दोन ते तीन लाख भाविक येत असतात. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणो व मुंबई या परिसरातून भाविक येतात. गुरूवारी सकाळी देवीला अभिषेक व पूजा, देवीची पुष्प सजावट, देवीचे दर्शन, आरती आणि देवीची पालखी मिरवणूक आणि भव्य शोभायात्र काढण्यात येणार आहे. शुक्रवारी देवीचा अभिषेक पूजा, पुष्पसजावट, देवीचा मान, सन्मान , नैवेद्य, कुस्त्यांचा जंगी सामना आणि आरती इत्यादी कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती जरी मरी सेवा मंडळांचे नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.