पश्चिम बंगाल : रामनवमीला उसळलेल्या दंगलीनंतर आता पोलीस बंदोबस्त तेैनात
कोलकाता : पश्चिम बंगालच्या हावडा आणि नॉर्थ दिनाजपुर जिल्ह्यात गुरुवारी विश्व हिंदू परिषदेतर्फे रामनवमीनिमित्त आयोजित रॅलीवर दगडफेक झाली. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यानंतर २४ तासात पुन्हा दगडफेक झाली. यात तीन पोलीस आणि १५ जण जखमी झाले. १० वाहने जाळण्यात आली. २० हून अधिक दुकानांची तोडफोड झाली.
हावडाचे पोलीस आयुक्त प्रवीण त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण दोन ठिकाणी गुन्हे दाखल जाले आहेत. ३८ जणांना अटक झीली आहे. तर अन्य संशयित रडारवर आहेत. पोलीसंनी ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केले आहे.
हिंसाचारानंतर पोलीसानी ड्रोनद्वारे सर्वांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. एका प्राध्यापकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, "या सर्व प्रकरणात गुडडू शेख नावाच्या व्यक्तीचा हात आहे. त्याच्याच सांगण्यावरुन रामनवमी मिरवणूकीवर दगडफेक करण्यात आली.
रॅलीमध्ये घोषणाबाजी झाली होती. याचा बदला घेण्यासाठी गुड्डू शेखने दगडफेक केली. तो इथे रिक्षाचालक-मालक संघटनेचा प्रमुख आहे. तसेच एका नेत्याचा जवळचा सहकारीही आहे. यापूर्वीही इथे असाच हिंसाचार झाला. मात्र, सरकारला माहिती असूनही बेजबाबदारपणा दिसला."
ममता सरकारच्या पोलीसांना उशीरा सुचलेले शहाणपण!
रविवारी पोलीसांचे ड्रोन हे दंगलग्रस्त भागात घिरट्या घालत होते. ड्रोनमधून मिळालेल्या फुटेजमध्ये दगड-विटांच्या हल्ल्याचे निशाण स्पष्ट दिसत होते. हिंसाचारावेळी जाळपोळ झालेल्या गोष्टीही दिसत आहेत.
हिंसाचारामुळे लहान मुले व स्त्रिया घराबाहेर निघालेच नाहीत. दबक्या आवाजात पोलीसांविरोधात स्पष्ट नाराजी दिसत आहे. हाच बंदोबस्त जर का वेळीच केला असता तर असे परिणाम दिसले नसते, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे.