हिंदूविरोधी भाषणे ओकून थकले अन् देवपूजेला लागले!

24 Apr 2023 18:25:25
 
Jitendra awhad tweet
 
 
मुंबई : हिंदूविरोधी भाषणे ओकून थकले अन् देवपूजेला लागले, ते म्हणजे जितेंद्र आव्हाड. माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू देवी-देवता आणि हिंदू सणांवर केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात अनेकवेळा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आव्हाडांची नेमकी भुमिका काय? हे सर्वांनाच ज्ञात आहे. परंतु, आव्हाडांनी सोशल मिडीयावर एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी 'करुणा मूर्ती मर्यादा पुरशोत्तम श्री राम की जय…' असे म्हटले आहे.
 
आव्हाडांनी या ट्विट सोबत, प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचा एकत्रित फोटो पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड म्हणाले होते की, "रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात." असे वादग्रस्त विधान केले होते. यावक्तव्यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0