जालना : विरोधी पक्षनेते अजित पवार हे बहुमताच्या बाजूने आल्यास मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सूचक वकतव्य रावसाहेब दानवे यांनी केले. दानवे म्हणाले, अजित पवार हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात.
अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा रंगलेल्या असताना आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सूचक वकतव्य केले आहे. २०२४ साली नाही तर आपल्याला आताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे वकतव्य अजित पवारांनी केले होते. याविधानावर बोलताना रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली.