मुंबई : उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली दहा कामं दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा. असे म्हणत मनसे नेते गजानन काळे यांनी टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. याच टीकेचा समाचार गजानन काळे यांनी घेतला आहे.
सुषमा अंधारेंवर पलटवार करताना गजानन काळे म्हणाले, "शिवसेना म्हणजे हा काँग्रेसने पाळलेला परडीतला नागोबा असं म्हणायचं आणि नागीण ताई त्याच नागोबाच्या कळपास जाऊन मनसेवर फुत्कार मारतायत. तुमचा पक्ष मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत असो राज्याच्या सत्तेत असो नाहीतर इतकी वर्ष विरोधी पक्षात असो तुमच्या सन्माननीय नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली दहा कामं दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा अशी योजना जरी आणली तरी तुमचं नेतृत्व त्याच्यामध्ये नापास होईल. तुमच्या नेतृत्वाला प्रश्न विचारले तर पळताबुडी थोडी होईल एवढं नक्की."