ब्रेंकीग न्यूज ; जम्मू- काश्मीरमध्ये ४ जवान हुतात्मा

    20-Apr-2023
Total Views |
indian-army-truck-fire-accident-update-jammu-kashmir

नवी दिल्ली
: जम्मू-काश्मीरमधील पुंछ भागात जवानांच्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चार जवान हुतात्मा झाले आहेत. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


indian-army-truck-fire-accident-update-jammu-kashmir

वीज पडल्याने ट्रकला आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याचवेळी लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. स्फोट, ग्रेनेड हल्ला आणि वीज पडणे ही आग लागण्याची तीन कारणे समोर आली आहेत, असे लष्कराच्या सूत्रांचे म्हणणे आहे. या आगीत संपुर्ण गाडी जळून खाक झाली आहे. पोलीस आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू आहे.


ज्या भागात हा अपघात झाला तो भाग पुंछपासून ९० किलोमीटर अंतरावर आहे. गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यास मदत केली.