वीज पडल्याने ट्रकला आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याचवेळी लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. स्फोट, ग्रेनेड हल्ला आणि वीज पडणे ही आग लागण्याची तीन कारणे समोर आली आहेत, असे लष्कराच्या सूत्रांचे म्हणणे आहे. या आगीत संपुर्ण गाडी जळून खाक झाली आहे. पोलीस आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू आहे.