श्री सदस्यांचा मृत्यू सलग सात उपाशी राहिल्याने; शवविच्छेदन अहवालात उघड!

20 Apr 2023 13:12:24
 
Shri sevak member death case
 
 
मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागलं. या सोहळ्यादरम्यान काही जणांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली.
 
तसेच ही दुर्घटना फक्त सरकारच्या निष्काळजीपणा आणि योग्य नियोजन नसल्यानेच झाल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे. भर दुपारी झालेल्या या कार्यक्रमाला आलेल्या १४ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर अनेकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले.
 
यानंतर आता शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यातून धक्कादायक बाब उघड झाली आहे. मृत्यू झालेल्या श्रीसेवकांध्ये सहा ते सात श्री सदस्यांनी काहीही खाल्लं नव्हतं हे उघड झालं आहे. तर त्यांना पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
Powered By Sangraha 9.0