...तर कोरोना मृतांच्या आकडेवारीवरही गुन्हा दाखल होऊ शकतो!

20 Apr 2023 18:47:00

Raj Thackeray
 
 
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधला. खारघर दुर्घटनेबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, "तो एक अपघात होता. त्याच राजकारण करु नये. अपघाताचं काय राजकारण करायचं? तसंच म्हटलं तर मग कोरोनामध्ये किती माणसं गेली. त्या प्रकरणातसुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल."
 
वरळीतील बीडीडी चाळ संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले, "नागरिकांच्या पूनर्विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तिथे नक्की काय होणार, याची माहिती रहिवाशांना नाही. सरकारने ती द्यावी, अशी मागणी केली आहे. घरं कशी असणार?, शाळा होणार का? स्पेस किती असेल? याबाबत चर्चा केली. त्यासंबंधित अधिकारी तेथे आले होते. नवी मुंबईतील सिडकोच्या लॉटरीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. २२ लाखाचे घर ३५ लाखाला केले आहे, ते परत २२ लाखाला कसे करता येईल यावरही चर्चा झाली."
 
तसेच कलेक्टर लाईनच्या शासकीय घरांबाबतही चर्चा झाली. तिथे अनेक जीर्ण घरे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पॉलिसी करतील. पोलिसांच्या घराच्या मुद्द्यासंदर्भात मागणी केली. पोलिसांना १५ लाखांत घरं देण्याचा करार करा. अशी मागणी केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
 
 
 
Powered By Sangraha 9.0