नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १० जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे बनू शकत नाही, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांचा भाजपच्या नेत्यांकडून समाचार घेण्यात येत आहे.
राजधानी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जीतो अहिंसा रनमध्ये वृत्तसंस्थेशी बोलताना मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सावरकरांचा अपमान केल्याबद्दल देश राहुल गांधींना कधीही माफ करणार नाही. राहुल गांधींनी १० जन्म घेतले तरी ते सावरकर होऊ शकत नाहीत, असा टोला लगावला आहे.