धर्मांतर करण्याचा दबाव, अंगावर गोमांस फेकले, देवतांचा अपमान!

19 Apr 2023 15:26:11
survey-on-hate-against-hindu-students-in-schools-of-united-kingdom-uk-britain-pressure-of-islamic-conversion

लंडन
: ब्रिटेनच्या शाळेमधील हिंदू विद्यार्थ्यांची अवस्था दयनीय होत आहे. विद्यार्थ्यांचा होणारा छळ टाळायचा असेल तर या विद्यार्थ्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले जाते. एका 'थिंक टँक'ने केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की, वर्गात हिंदू विद्यार्थ्यांची चेष्टा केली जाते. 'हेन्री जॅक्सन सोसायटी'ने हा अभ्यास केला आहे.ब्रिटनमध्ये हिंदू हा तिसरा मोठा समुदाय आहे. ब्रिटेनमधील एका शाळेत एका हिंदू विद्यार्थिनीला तिच्या वर्गमित्रांनी अंगावर गोमांस फेकल्याची घटना ही घडली. ब्रिटनमध्ये दहा लाखांहून अधिक हिंदू राहतात. आता शेर्लोट लिटिलवुडने लिहिलेला नवा दस्तावेज समोर आला आहे जो धक्कादायक आहे. ते कट्टरपंथीयांच्या विरोधात आहेत. त्यांनी ९८८ हिंदू पालकांशी संवाद साधला आणि देशभरातील सुमारे १००० शाळांचे सर्वेक्षण केले.

अलीकडेच ब्रिटनमधील लेस्टर आणि बर्मिंघममध्ये लक्ष्य केले जात आहे. ब्रिटनच्या शाळांमध्येही हिंदू विद्यार्थ्यांविरुद्ध असाच भेदभाव वाढत आहे. सर्वेक्षणात, ५० टक्के हिंदू पालकांनी सांगितले की त्यांच्या मुलांना शाळांमध्ये द्वेषाचा सामना करावा लागतो. सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या हिंदूविरोधी दंगलीनंतर,लेस्टर पोलिसांनी ५५ जणांना अटक केली. . मालमत्तेचे नुकसान करणे, हल्ला करणे, मंदिरांवर हल्ले करणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांशी भेदभाव करण्याच्या घटना आणि लेस्टरमधील हिंदूंवरील हिंसाचार यात साम्य आहे. जसे की, गोमांसासाठी हिंदूंचा अपमान करणे आणि शाकाहारी असल्याबद्दल त्यांची चेष्टा करणे. यासोबतच त्यांच्या देवतांचाही अपमान केला जातो. भारतात मुस्लिमांवर भेदभाव केल्याचा आरोप करून, ब्रिटनमधील हिंदू विद्यार्थ्यांना येथे घडणाऱ्या घटनांबद्दलही द्वेषाची वस्तू बनवले जाते.
 
इतकेच नाही तर ब्रिटीश शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांना 'काफिर' संबोधून त्यांचा अपमानही केला जातो. त्यांना मुस्लिम हो, नाहीतर त्यांचे जीवन नरक बनवले जाईल असे सांगितले जाते. एका मुलाला सांगण्यात आले की तुला स्वर्गात जायचे असेल तर इस्लाममध्ये ये, नाहीतर तू जगणार नाहीस. तसेच इस्लामिक धर्मोपदेशकांचे व्हिडिओ दाखवून एकाला धर्मांतर करण्यासही सांगण्यात आले.भारतातील जातिव्यवस्था आणि देवी-देवतांच्या पुजेबाबत अनेक गैरसमज पसरवून या आधारावर हिंदू विद्यार्थ्यांचा अपमान तिथे केला जातो. त्यांना दिवाळीची सुट्टीही दिली जात नाही. केवळ १ % शाळा अशा आहेत ज्यांनी हिंदू मुलांवरील घटनांची दखल घेतली. हिंदू धर्माचा द्वेष करून चुकीच्या गोष्टी शिकवल्या जात आहेत, त्यामुळेच हे सर्व घडत आहे.



 
Powered By Sangraha 9.0