नवी दिल्ली : देशात मागील २४ तासात १०,५४१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असून देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आले आहे. तसे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सबंधित यंत्रणेला दिले आहेत. कोरोना वाढीचा दर नियंत्रित असला तरी आरोग्य यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेतला जातोय.
देशात सक्रीय रुग्णांची संख्या ६३,५६२ वर पोहोचली आहे. तर कोरोना पॉझिटीव्हिटी दर ४.४ टक्के इतका वाढला आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन लागण्याची चर्चा सुरू आहे. तशा अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी लॉकडाऊन लावण्याइतपत परिस्थिती उद्भवणार नाही, असे आरोग्य तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.