२०२४च्या लोकसभा निवडणुकीवर विनोद तावडेंचं सुचक ट्विट!

19 Apr 2023 11:58:39
 
Vinod Tawade
 
 
मुंबई : भाजप नेते विनोद तावडे यांनी माध्यमांद्वारे अहवाल सादर केल्याचे सांगितले जात होते. मात्र, या सर्व प्रकरणावर विनोद तावडे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे. असं ते म्हणाले आहेत.
 
ट्विटरद्वारे विनोद तावडे म्हणाले, "दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे."
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0