राज्यावर दुष्काळाचं सावट? मंत्रीमंडळ बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय!

19 Apr 2023 18:51:43
 
Drought in the state
 
 
मुंबई : यंदाच्या मान्सूनबाबत विविध संस्थांच्या अहवालावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावर्षी ८७० मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता आहे. मागच्या वर्षी हवामान खात्याने ९९ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण यावर्षी ९६ टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज दिला आहे.
 
नद्याचे गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात करा, असे आदेश राज्या सरकारने दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांवर एकामागोमाग संकंटं सुरु आहेत. दुष्काळ जर पडला तर काय काय उपाययोजना करायच्या यावर राज्य सरकार गंभीर असल्याचं दिसून येत आहे.
 
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, देशात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊसमान राहणार आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ ९४ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या चार वर्षात अल निनोमुळे चांगला पाऊस झाला होता. पण यावर्षी अल निनोचा प्रभाव वाढल्यामुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0