चिमुरड्यांनी केली ‘ग्रे बॅबलर’ पक्ष्याची सुटका

18 Apr 2023 22:30:23
ramwadi-little-childrens-ones-rescued-gray-babbler-bird-from-clutches-manja

पुणे
: पायात अडकलेल्या मांज्याच्या विळख्यातून निपचित पडलेल्या ‘ग्रे बॅबलर’ पक्ष्याची पाच चिमुकल्यांनी केली सुटका. रामवाडी येथील कामगार वस्तीत मुलांना खेळताना ‘ग्रे बॅबलर’ पक्षी नायलॉन मांज्याच्या विळख्यात अडकलेला दिसला. चिमुकल्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याची सुटका केली. मानेचा व दोन्ही पायाचा मांजा कात्रीने कापला, पाणी पाजले, त्यानंतर त्या पक्ष्याला उडण्यासाठी झाडीजवळ सोडून देण्यात आले. कृष्णा राठोड, वैष्णवी राठोड ,सोनाली राठोड, पूजा राठोड या लहान मुलांनी ‘ग्रे बॅबलर’ पक्ष्याला जीवदान दिले.


Powered By Sangraha 9.0