महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू! माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
पृथ्वीराज चव्हाण यांनी केला मोठा दावा
18-Apr-2023
Total Views |
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. अशावेळी महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्यांचा दावा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा चुकीची असून तसे होणार नाही, असे ही चव्हाण म्हणाले आहेत.
ऑपरेशन लोटस म्हणजे काही आमदारांनी राजीनामा द्यायचा. म्हणजे सभागृहातील सदस्यांची संख्या कमी होईल.यामुळे बहुमताचा आकडा ही कमी होणार. त्यानंतर समीकरण बदलेल. राजीनामा दिल्यानंतर आमदार सामान्य नागरिक होतील आणि ते मंत्री होऊ शकतात. त्यामुळेच कर्नाटक आणि मध्यप्रदेशसारख्या प्रयोगाची शक्यता निर्माण होणार आहेत. हे कोण करू शकेल तर ज्यांना आपल्या पुन्हा निवडून येण्याची खात्री आहे तेच आमदार राजीनामा देतील. मात्र दुसरीकडे भाजपमध्ये आमदारांचा पक्ष प्रवेश करून घेतला जाईल का यावर ही चव्हाणांनी मत मांडले.