मुंबईत अॅपलचे पहिले स्टोर!

    18-Apr-2023
Total Views |
apple store in mumbai

मुंबई
: आयफोन निर्माता ऍपल या कंपनीने मंगळवार १८ एप्रिल रोजी भारतात पहिले ऍपल स्टोर सुरु केले आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरचे उद्घाटन केले. हे स्टोअर २०,००० चौरस फूट परिसरात पसरले आहे. अॅपल स्टोअरची रचना अक्षय ऊर्जेवर केली गेली आहे. म्हणजेच ती पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालते.

अॅपलचे भारतात २५ वर्ष आहेत आणि त्याच पार्शवभूमीवर ऍपलने भारतात ऍपल स्टोअर सुरु केले आहे. अॅपलने भारतात पहिल्यांदा Macintosh १९८४ मध्ये आणले होते आणि आता २५ वर्षांनंतर बीकेसी मुंबई मध्ये पहिले अॅपल स्टोर सुरु झाले आहे. यावेळी "हा एक लांबचा प्रवास आहे, अॅपल भारतात आपले स्टोअर उघडत आहे याचा मला आनंद आहे,"असे अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी म्हटले आहे.