लाहोर : भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीमुळे हजारो लोकांना आपली घरे सोडून सीमेपलीकडे जावं लागलं. त्यापैकी पंजाबचे ९८ वर्षीय बाबा पूरण सिंग यांचाही समावेश आहे. सिंग यांनी अलीकडेच ७७ वर्षांनंतर पाकिस्तानातील त्यांच्या वडिलोपार्जित गावाला भेट दिली आणि हा त्यांच्यासाठी तसंच सीमेपलीकडील गावकर्यांसाठी भावनिक क्षण होता.
पाकिस्तानातल्या गुजरनवाला जिल्ह्यातील कोट देसराजमध्ये बाबा पूरण सिंग यांनी प्रवेश करताच, गावातील लोकांनी त्यांना पुष्पहार घातला. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या घराच्या छतावरून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला तसंच ढोलताशांचा गजरही झाला.
दरम्यान, सिंह यांनी तरूण असताना लोकांची नावे लक्षात ठेवली आणि त्यांचा ठावठिकाणा विचारला. नासिर ढिल्लॉन, या ब्लॉगरने ही भेट घडवून आणली आणि पंजाबी लेहर टीव्ही चॅनेलवर या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला.पूरण सिंग शेअर सांगतात की ते २१ वर्षांचे असताना त्यांनी पाकिस्तानातील आपलं गाव सोडलं. त्यांना त्यांच्या गावाचा आणि आजूबाजूच्या भागात जाण्याचे रस्ते आठवतात का तेव्हा ते म्हणाले की आता रस्ते बदलले आहेत. तसंच त्यांनी या रस्त्यांवरच्या त्यांच्या मित्रांसोबतच्या आठवणीही जागवल्या.