देहरादून (Land Jihad in Uttrakhand) : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींनी लॅण्ड जिहादविरोधात आघाडी उभी केली आहे. देवभूमीवर होणाऱ्या जिहादी आक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. देवभूमीवर सुरू असलेल्या मजार जिहादाला खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील अधिक माहिती देताना धामी म्हणाले की, "आमच्या सरकारने एक हजार बेकायदा मजारींची यादी तयार केली."
ते म्हणाले की, "गंगा नदीच्या किनाऱ्यावर सुरू असलेल्या अतिक्रमणावर सरकार लक्ष ठेवून आहे." इथल्या धर्मनगरीसह अन्य पर्यटन स्थळांवर सुरू असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा पेटून उठला आहे. मुख्यमंत्री धामी यांनी १६ एप्रिल रोजी ऋषिकेशचा दौरा केला. यावएळी परमार्थ निकेतनमध्ये गंगा आरतीलाही सहभागी झाले."
ते म्हणाले, "आजूबाजूच्या तटांवर अनेक प्रकारचे अतिक्रमण सुरू आहे. उत्तराखंडमध्ये लॅण्ड जिहादच्या नावे सुरू असलेली अतिक्रमणे आता खपवून घेतली जाणार नाही. ही अतिक्रमणे हटविण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे.” या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी स्वतः चिन्हांकीत केलेल्या अतिक्रमणांची संख्या हजारवर पोहोचली आहे." मुख्यमंत्र्यंनी ही माहिती दिल्यावर उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या घोषणेचे स्वागतही केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
उत्तराखंडमध्ये होत असलेल्या जमिनींच्या अतिक्रमणावर अनेक प्रश्न उपस्थित रहात आहेत. लॅण्ड जिहाद, बेकायदा मजारी, मदरसे यांच्याबद्दल २०२१ पासून आवाज उठवला जात आहे. यात रेल्वे बोर्ड, सरकारी जमिनींवर सुरू असलेल्या बेकायदा अतिक्रमणाची माहिती आहे. मुख्यमंत्री धामी यांनी यापूर्वीच पहाडी भागात सुरू असलेल्या मजारींच्या अतिक्रमणांवर चिंता व्यक्त केली होती. यापूर्वी मार्च २०२३ मध्ये ४१ बेकायदा मजारी पाडण्याचे काम धामी सरकारने केले होते.