नरसिंहपूरः मध्य प्रदेशातल्या नरसिंहपूर येथील बरमान-सगरी राष्ट्रीय महामार्ग- ४४ वर एक भीषण अपघात झाला. या अपघातात महंत कनक बिहारी महाराज यांचं निधन झालं आहे. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी डिव्हायडरवर आदळली आणि पलटी झाली. या घटनेतील तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. महंत कनक बिहारी दास महाराज यांनी उत्तर प्रदेशातल्या अयोध्या येथील राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे त्यांची देशभर चर्चा झाली होती.