शिंदेंनी दिला ठाकरेंना दणका! महत्वाचा नेता करणार पक्षप्रवेश

17 Apr 2023 19:43:35
amey ghole leave shivsena ubt

मुंबई
: शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अमेय घोले यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला दुसऱ्यांदा राजकीय धक्का बसला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अमेय घोले समजले जातात. त्यामुळे ठाकरे गटाला वडाळा विधानसभेत आणखी एक धक्का बसला.

तसे पत्र अमेय घोले यांनी समाजमाध्यमांवर प्रसिध्द केले. त्या पत्रात म्हटले आहे की मी राजकारणात आलो तुमच्यामुळे. तुम्ही माझ्या वर विश्वास दाखवलात आणि मला युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेले १३ वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडली, असे अमेय पत्र लिहून आदित्य ठाकरेंनी आपला पक्षसोडीचा निर्णय जाहीर केला.



अमेय घोले यांनी पत्रातून गंभीर आरोप केला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गट महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणायचा प्रयत्न केला त्यामुळे मला काम करताना खूप मनस्ताप झाला, असा उल्लेख केला आहे. त्यांनी पुढे पत्रात म्हटले, की " याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे व मला सुरळीतपणे माझे कार्य सुरू ठेवता यावे म्हणुन मी खूप प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही. त्यामुळे आज अखेरीस जड अंतःकरणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे."

दरम्यान, पक्षातील अंतर्गत वादामुळे अमेय घोले यांनी पक्षाचा राजीनामा दिला. तर आदित्य ठाकरेंशी असलेले मैत्रीचे संबंध हे केवळ राजकारणापुरती नाही, तुमच्या बरोबरचा संघटनेतील प्रवास थांबवत असला तरी आपली मैत्री कायम राहावी, असा संदेश ठाकरेंना दिला.


Powered By Sangraha 9.0