नाराजीच्या चर्चा पाठ सोडेनात

17 Apr 2023 18:42:07
ajit pawar ncp

मुंबई
: महाराष्ट्रात मागील काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असलेले अजित पवार पुन्हा एकदा आपल्या कृतीमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अजित पवार हे सोमवारी पुण्यातील विविध सामाजिक आणि इतर कार्यक्रमांना हजेरी लावणार होते. मात्र, त्यांनी अचानक पुणे आणि आसपासच्या परिसरात होणारे आपले सर्व कार्यक्रम रद्द करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यालाही दांडी मारली आहे. अजित दादांच्या या हालचालींमुळे त्यांच्याविषयी पुन्हा एकदा बोलले जात असून नाराजीच्या चर्चा काही केल्या त्यांची पाठ सोडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार यांनी दोन आठवड्यात सलग दुसऱ्यांदा पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केल्यामुळे माध्यमांमध्ये चर्चां सुरु झाल्या आहेत. यापूर्वी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत सत्तास्थापनेबाबत चर्चा केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता अजित पवारांनी नियोजित कार्यक्रम रद्द केल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




Powered By Sangraha 9.0