राज ठाकरेंची ६ मे रोजी कोकणात जाहीर सभा!

    16-Apr-2023
Total Views |
Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या महाराष्ट्रातील दौर्‍यासाठी नेहमीच चर्चेत असतात. आता लवकरच राज ठाकरे कोकण दौर्‍यावर जाणार असून दि. 6 मे रोजी कोकणात राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. ‘शिवतीर्थ’वर दि. 16 एप्रिल रोजी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरेंच्या आगामी महाराष्ट्र दौर्‍याच्या आणि कोकणातल्या जाहीर सभेचा आढावा घेण्यात आला. राज्यातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवरही मनसे नेत्यांसोबत यावेळी चर्चा पार पडली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे,अविनाध जाधव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.