मुंबई : राष्ट्रवादी पक्षाला कर्नाटक विधानसभा निवडणुका 'घड्य़ाळ' या चिन्हावर लढण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. तशी मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाने घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढू द्यावी अशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा 'घड्याळ' या चिन्हाचा वापर करून निवडणूक लढवू शकतो.
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने या पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने निवडणूक आयोगाला विनंती करुन त्यांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. आता राष्ट्रवादी पक्षाचा घड्याळ या चिन्हावर कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटक विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ४० ते ४५ जागा लढवण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगानं काढून घेतला आहे. २३ वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा आता महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यपुरता असणार आहे.