केजरीवाल हे दारू घोटाळ्याचे सूत्रधार – भाजपचा आरोप

15 Apr 2023 20:28:27
bjp slams arvind kejriwal

नवी दिल्ली
: दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. याबाबत भाजपने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांच्यावर ते दारू घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे सांगून पाच प्रश्न विचारले आहेत.

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, 'आप' हा कट्टर अप्रामाणिक पक्ष आहे. केजरीवालांकडे लपकरच बेड्या चालून येणार असून घोटाळ्याची शिक्षा होणार आहे. अरविंद केजरीवाल हे दारू घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार आहेत. यापूर्वी केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षातील ज्या ज्या नेत्यांना ईमानदारीचे प्रमाणपत्र दिले होते, ते सर्व नेते विविध घोटाळ्यांमध्ये तुरुंगात आहेत. त्यामुळे आता केजरीवाल यांच्यावरही कारवाई होईल, असा विश्वास भाटिया यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी भाजपतर्फे केजरीवाल यांना पाच प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामध्ये, मद्य धोरणाच्या महत्वाच्या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे होते, त्यामुळे त्यांची चौकशी का होई नये असे भाजपने विचारले आहे. त्याचप्रमाणे मुख्य आरोपी समीर महेंद्रूसोबतचे केजरीवाल यांचे संभाषण, दारूच्या ठेकेदारांशी संबंध आणि मद्य धोरण योग्य होते, तर ते मागे का घेतले असे सवाल भाजपने विचारले आहेत.

दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील शनिवारी पत्रकारपरिषदेत सांगितले की मी बेईमान असेल तर जगात कोणीही ईमानदार असू शकत नाही. ते पुढे म्हणाले, केजरीवाल पुढे म्हणाले, वर्षभर चौकशी केल्यानंतर १०० कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारच्या आऱोपांना आम आदमी पक्ष घाबरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


Powered By Sangraha 9.0