मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेल्वेने त्यांच्याशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रवाशांनी भरलेल्या विशेष भारत गौरव पर्यटक ट्रेनला शुक्रवार १४ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आयआरसीटीसी द्वारे आयोजित एका विशेष कार्यक्रमात, विशेष ट्रेनला हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विशेष ट्रेन रवाना
बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे स्मरण करून, आयआरसीटीसी ने त्यांच्याशी निगडीत देशातील महत्वाच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी एक टूर प्रोग्राम तयार केला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने या दौऱ्याला “बाबा साहेब आंबेडकर यात्रा” (IRCTC बाबासाहेब आंबेडकर यात्रा) असे नाव दिले आहे. हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून शुक्रवार दिनांक १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रवाशांना घेऊन जाणारी विशेष ट्रेन रवाना झाली.
बाबासाहेब आंबेडकर यात्रेची ७ रात्री आणि ८ दिवसांची भारत गौरव पर्यटक ट्रेन दिल्ली हजरत निजामुद्दीन येथून निघून महू (आंबेडकरांचे जन्मस्थान) येथे पोहोचेल, येथून नागपूर, सांची, वाराणसी, सारनाथ, बोधगया, राजगीर आणि नालंदा करत पुन्हा हजरत निजामुद्दीन म्हणजेच दिल्लीला परतेल.