थॅलेसेमिया रुग्णांसाठी विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन

13 Apr 2023 18:25:27
Thalassemia-Blood-Donation-Camp-Jeevandata-Social-Organization

मुंबई
: जीवनदाता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रशांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त व युनिक ब्लड मोटिव्हेटर्स च्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त तसेच मैत्र दिंडी फेसबुक परिवार व रुग्णमित्र संस्था च्या सोबतीने थॅलेसेमिया रुग्णांसाठी विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाजसेवी उपक्रमात 69 स्वैच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी जीवनदाचे अध्यक्ष प्रशांत म्हात्रे यांनी 94 वे संस्थापक गणेश आमडोसकर यांचे 112 वे, जयराम नाईक 83 वे, हेमंत सर्वया 74 वे, संजय कुलकर्णी 58 वे, शशिकांत कुड 49 वे, दर्शन म्हात्रे 31 वे, अमोल सावंत 41 वे, जय साटेलकर 59 वे, ऋषिकेश पाटील 26 वे, गजानन नार्वेकर 79 वे, संदीप खामकर 38 वे, सचिन गुंड 37 वे या सर्वाचे वैयक्तिक रक्तदान व इतर कार्यकत्र्यांचे रक्तदान संपन्न झाले.

रक्तदान क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशांत मात्र यांना सर्वांनी वैयक्तिकपणे रक्तदान करून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली. प्रशांत म्हात्रे यांचे संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होते, 25 कार्यकर्ते काही कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत. हा रक्तदान सोहळा पार पाडण्यासाठी उपरोक्त संस्थेचे सर्व कार्यकर्ते नी मेहनत भरपूर मेहनत घेतली.


Powered By Sangraha 9.0