बिहारमध्ये भूकंपाचे धक्के

13 Apr 2023 07:00:54
Bihar Earthquake


पाटणा
: बिहारमधील सीमांचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे बुधवारी पहाटे ५.३० वाजता धक्के जाणवले. सहरसा, मधेपुरा, कटिहार, किशनगंज, पूर्णिया, अररिया येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी मोजण्यात आली आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू राणीगंज आणि बनमनखी दरम्यान होता. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.


Powered By Sangraha 9.0