वैभव नाईकांना त्यांच्याच मतदार संघात हुसकावलं!

11 Apr 2023 17:41:13
 
Vaibhav Naik
 
 
कुडाळ : आमदार वैभव नाईक आणि नागरिकांमध्ये राडा झाला आहे. कुडाळ येथील पावशी गावातील नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक यांना त्यांच्याच मतदार संघात धक्काबुकी करण्यात आली. यावर, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत जागरुक नागरिकांचे आभार मानले आहेत.
 
कुडाळ येथील पावशी गावातील नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक यांना धक्काबुक्की झाली. यावेळी ठाकरे गट आणि नागरिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर थोडी धक्काबुक्कीही झाली आहे. उपस्थित लोकांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
 
आपल्या मतदारसंघातील नळपाणी योजनेच्या भुमिपुजनासाठी गेलेल्या आमदार वैभव नाईक यांना नागरिकांकडून रोखण्याचा प्रयत्न झाला. युवा मोर्चाचे पदाधीकारी पप्या तवटे,आमदार वैभव नाईक यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
 
 
 
 
 
निलेश राणेंनी ट्विट करत सांगितले, 'केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचं भूमिपूजन करणाऱ्या वैभव नाईकला गावा गावातून विरोध होत आहे. आज कुडाळ तालुक्यातील पावशी गावात स्थानिकांनी एकत्र येत उबाठा गट आमदार वैभव नाईकचा अक्षरशः पळवून लावला.' य़ाबद्दल त्यांनी जागरूक नागरिकांचे अभिनंदन केले.
 
 
Powered By Sangraha 9.0